Tuesday, June 6, 2023

Bank Account शी मोबाईल नंबर लिंक करणे महत्त्वाचे का आहे??? जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Account : आजकाल बँकेशी संबंधित बहुतेक कामे मोबाईलवरूनच केली जात आहेत. कारण सध्याच्या काळात प्रत्येकाचा मोबाईल नंबर बँकेच्या खात्याशी जोडला गेला आहे. ज्याद्वारे ऑनलाइन पेमेंट, UPI, मनी ट्रान्सफर इत्यादी गोष्टी अगदी सहजपणे केल्या जातात. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जवळपास सर्वच बँकांकडून बँक खात्याशी मोबाईल क्रमांक लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जर आपल्या बँकेच्या खात्यातील रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक हरवला असल्यास आता तो सहजपणे बदलता येईल. हे लक्षात घ्या कि, आतापर्यंत यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागत होते, मात्र आता हे काम अगदी घरबसल्या करता येईल. याशिवाय, ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेच्या एटीएममधूनही मोबाइल नंबर बदलता येईल. Bank Account

Bank Account Rules: कभी मत कीजिए ये गलतियां वरना बंद हो जाएगा आपका बैंक  अकाउंट| Zee Business Hindi

मोबाईल नंबर लिंक करणे का महत्वाचे आहे???

RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरबीआयकडून ग्राहकांना ई-मेल आयडी देखील अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता ई-मेलमध्ये उत्तर देण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्याद्वारे फसवणुकीची थेट तक्रार करता येणार आहे. याआधी बँकेकडून येणाऱ्या ईमेलमध्ये उत्तर देण्याचा पर्याय देण्यात येत नव्हता. Bank Account

How To Link Aadhaar To Your SBI Account Online? - Goodreturns

मोबाईल नंबर लिंक नसल्यास ऑनलाइन ट्रान्सझॅक्शन करता येणार नाही

जर आपल्याला ऑनलाइन ट्रान्सझॅक्शन करायचे असेल तर आपला मोबाईल नंबर बँकेच्या खात्याशी लिंक करावा लागेल. RBI च्या सूचनेनुसार ज्या लोकांनी आपले बँक खाते मोबाईल क्रमांकाशी लिंक केलेले नाही, त्यांना यापुढे ऑनलाइन बँकिंग वापरता येणार नाही. तसेच, ऑनलाइन फसवणुकीबाबत RBI चे म्हणणे आहे की, जर आपण फसवणुकीबाबत 3 दिवसांच्या आत बँकेमध्ये तक्रार दाखल केली तर पुढील 10 दिवसांत खात्यामध्ये पैसे परत केले जातील. Bank Account

SBI account mobile registration: How to register your mobile number with  your SBI account

बँक खात्यामधील मोबाईल नंबर कसा बदलावा ???

आता बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर घरबसल्या सहजपणे बदलता येईल. आजकाल बहुतेक बँकांकडून ऑनलाइनच ही सुविधा दिली जाते. ज्यामुळे खात्यामध्ये ऑनलाइन लॉग इन करून हे बदलता येईल. याशिवाय, ज्या बँकेत आपले खाते आहे, त्या बँकेच्या एटीएममधूनही मोबाइल नंबरही बदलता येईल. त्याच वेळी, बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊनही खात्याशी लिंक केलेला मोबाइल नंबर अपडेट करता येईल. Bank Account

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.sbi/

हे पण वाचा :
Car कंपन्यांकडून कार खरेदीवर दिली जाते आहे लाखो रुपयांची सवलत, जाणून घ्या यामागील कारणे
Business Idea : हमखास कमाई मिळवून देणार ‘हा’ व्यवसाय, कसा सुरू करावा ते जाणून घ्या
BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये डेटासोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग
Bank Holidays : जानेवारीमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, इथे पहा लिस्ट
Jio कडून नवीन वर्षासाठी धमाकेदार रिचार्ज प्लॅन लाँच, जाणून घ्या अधिक तपशील