नवी दिल्ली । देशातील बहुतांश बँकांच्या बचत खात्यावरील व्याजदरात लक्षणीयरित्या घट झाली आहे. त्याच वेळी, काही स्मॉल फायनान्स बँका आहेत, जिथे तुम्हाला बचत खात्यावर 7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. BankBazaar च्या आकडेवारीनुसार, स्मॉल फायनान्स बँका घसरलेल्या व्याजदरांमध्ये जास्त व्याजदर देतात.
AU Small Finance Bank
AU Small Finance Bank बचत खात्यावर 7 टक्क्यांपर्यंतचा व्याजदर देत आहे. या बँकेच्या बचत खात्यात 2 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत सरासरी मंथली बॅलन्स असणे आवश्यक आहे.
Equitas Small Finance Bank
Equitas Small Finance Bank बचत खात्यावर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. या बँकेच्या बचत खात्यात सरासरी मंथली 2500 ते 10000 रुपये बॅलन्स असणे आवश्यक आहे.
Ujjivan Small Finance Bank
Ujjivan Small Finance Bank ग्राहकांना बचत खात्यावर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
Suryoday Small Finance Bank
Suryoday Small Finance Bank बचत खात्यावर 6.25 टक्के व्याज दिले जात आहे. बचत खात्यात मंथली सरासरी 2,000 रुपये बॅलन्स असणे आवश्यक आहे.