BoB ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 मार्चपासून पैशांचे व्यवहार करता येणार नाहीत, याविषयी जाणून घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपलेही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. काही काळापूर्वी केंद्र सरकारने देना बँक आणि विजया बँक यांचे विलीनीकरण केले, त्यानंतर या दोन बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे ग्राहक झाले. 1 मार्च नंतर बँक आपल्या आयएफएससी कोडमध्ये बदल करणार आहे, तर आपण त्वरित आपला नवीन आयएफएससी कोड लक्षात घ्यावा. अन्यथा आपण 1 मार्च (1 मार्च 2021) नंतर आपण पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही.

BoB ने टि्वटवर माहिती दिली
1 मार्च 2021 नंतर ग्राहकांचे जुने आयएफएससी कोड काम करणार नाहीत, असे बँकेने म्हटले आहे. देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्वीटमध्ये लिहिले आहे की,”प्रिय ग्राहकांनो, कृपया लक्षात घ्या की, ई-विजया आणि ई-देना आयएफएससी कोड 1 मार्च 2021 पासून बंद होणार आहेत. ई-विजया आणि देना बँक शाखांकडून नवीन आयएफएससी कोड मिळवा. फक्त काही स्टेप्स फॉलो करा आणि सुविधांचा अनुभव घ्या.

Bank of baroda

टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता
IFSC सी कोडशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास आपण 1800 258 1700 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता किंवा आपण बँक शाखेत देखील भेट देऊ शकता.

मेसेज पाठवून माहिती मिळवा
याशिवाय आपण मेसेज देखील करू शकता. मेसेजमध्ये आपल्याला “MIGR <Space> Last 4 digits of the old account number” लिहावे लागेल. आता आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून हा मेसेज 8422009988 वर पाठवा.

या बँकांचे IFSC Code देखील बदलले जाईल
त्याशिवाय पंजाब नॅशनल बँकेनेही ट्विट केले की,”ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची जुनी चेकबुक आणि IFSC/MICR Code केवळ 31 मार्चपर्यंतच काम करेल. यानंतर तुम्हाला बँकेकडून नवीन कोड व चेकबुक घ्यावे लागेल.

ग्राहकांवर काय परिणाम होईल?
आयएफएससी कोडमधील बदलांचा परिणाम खातेदारांवर होईल. ऑनलाइन व्यवहारासाठी तुम्हाला बँकेचा आयएफएससी म्हणजेच इंडियन फायनान्शिअल सिस्टीम कोड जोडावा लागेल. तर आता आपला नवीन आयएफएससी कोडची त्वरीत माहिती करून घ्या, अन्यथा आपण 1 फेब्रुवारीपासून पैसे ट्रान्सफर करु शकणार नाही.

IFSC Code म्हणजे काय?
IFSC Code 11 अंकांचा असतो. आयएफएससी कोडमधील सुरुवातीची चार अक्षरे बँकेचे नाव दर्शवितात. आयएफएससी कोड इलेक्ट्रॉनिक पेमेंट दरम्यान वापरला जातो. त्या कोडद्वारे बँकेच्या कोणत्याही शाखेला ट्रॅक केले जाऊ शकते. आपण बँक खाते आणि चेक बुकद्वारे ते शोधू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment