कोरोनामुळं आयसीसीने टी-२० विश्वचषक पुढं ढकलला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने अखेर टी-२० विश्वचषकाचं आयोजन अखेरीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने याबद्दल आज अधिकृत घोषणा केली आहे. १८ ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयसीसी विचार करत होतं, परंतू यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता टी-२० विश्वचषकाचं आयोजन करणं अशक्य असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलणं जाणं ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती. दरम्यान २०२१ साली होणारा टी-२० विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाईल असंही आयसीसीने जाहीर केलं आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन केला. मध्यंतरीच्या काळात ऑस्ट्रेलियन सरकारने नियमांमध्ये शिथीलता आणली होती. परंतू रुग्णांची संख्या वाढताच सरकारने परत लॉकडाउन घोषित केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”