हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी फायद्याचे ठरू शकते. कारण, मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) शिपाई पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. केवळ ७ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ मार्च आहे. त्यामुळे येथे उमेदवारांनी त्वरीत अर्ज सादर करावेत.
पदभरतीची माहिती
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ४५ पदे भरण्यात येणार आहेत. निवडलेल्या उमेदवारांना मासिक १६,६०० ते ५२,४०० रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. या भरतीसाठी अर्जदाराने किमान ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षांदरम्यान असावे. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित असेल. अर्जाची मुदत संपत आल्यानंतर परीक्षेची तारीख देखील लवकरच जाहीर करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांनी हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकषांची पूर्तता करून मुदतीच्या आत अर्ज सादर करावेत.
महत्वाचे म्हणजे, ७ वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी ठरू शकते. त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. तसेच संपूर्ण माहिती पुन्हा एकदा वाचून ती योग्य पद्धतीने भरावी.