नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम जगभर पाहायला मिळत आहे. कच्चे तेल, इलेक्ट्रिक उत्पादनांनंतर आता खतांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याने खतांच्या पुरवठ्यावरही परिणाम होतो आहे. रशिया हा जगातील प्रमुख खत पुरवठादार देश आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियावर आर्थिक निर्बंध लादले जात आहेत, त्यामुळे खतांचा पुरवठा खंडित झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून खतांच्या किंमती10 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.
पोटॅशची आयात
खतांच्या निर्मितीमध्ये पोटॅशचा मोठा वाटा आहे. भारत पोटॅशची मोठ्या प्रमाणात आयात करतो. रशिया, युक्रेन आणि बेलारूस हे पोटॅशचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत. युद्धामुळे या देशांतून पोटॅशचा पुरवठा ठप्प झाला आहे. भारत रशिया, युक्रेन आणि बेलारूसमधून त्याच्या एकूण खत आयातीपैकी 10-12 टक्के आयात करतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चालू आर्थिक वर्षात प्रति मेट्रिक टन सुमारे $280 या दराने पोटॅशची आयात केली जात आहे. मात्र आता हे भाव खूप वाढले असून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे.
livemint.com च्या मते, खतांचा मोठा पुरवठादार असलेला मलिक निआंग सांगतो की, गेल्या 10 वर्षांच्या व्यवसायात त्यांनी एवढे मोठे पुरवठा संकट कधीच पाहिले नाही. ते स्पष्ट करतात की, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून, शिपिंग कंपन्यांनी त्यांचा माल रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये गोळा केला नाही. याशिवाय, रशियाविरुद्ध आर्थिक निर्बंधांमुळे रशियातून खत निर्यातीत मोठी घट झाली आहे. निआंगने सेनेगल आणि मोरोक्को सारख्या इतरच्या विक्रेत्यांशी संपर्क साधला, मात्रत्यांना सांगितले गेले की त्यांची ऑर्डर बुक वर्षाच्या अखेरीस भरली आहे.