प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; केली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेनंतर वर्षे झाली तरीही अजून सत्ताधारी आणि विरोधक भाजप यांच्यात तीव्र संघर्ष सुरु आहे. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात असताना आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल 11.36 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आहे. एनएसीएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्यावतीने आज प्रताप सरनाईक यांच्या ठाणे येथील मालमत्तेवर छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार जमीनींची किंमत 11.36 कोटी इतकी आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक यांच्यावर ईडीच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईमुळे सरनाईकांना चांगलाच दणका बसला आहे. ईडीने यापूर्वीही एनएसीएल प्रकरणात सरनाईक यांची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. आज अचानक ईडीने सरनाईक यांची संपत्ती जप्त केल्याने या कारवाईने खळबळ उडाली आहे.

दरम्यान काही दिवसापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावर आरोप केला होता. मी प्रताप सरनाईकांची फाईल बघायला मंत्रालयात गेलो, प्रताप सरनाईकांनी चोरी, लबाडीने बांधकाम केलं, त्यांना दंड माफ केला, ती फाईल बघायला मी चौथ्या मजल्यावर गेलो होतो असे सोमय्या छातीठोकपणे सांगितले होते.

Leave a Comment