हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षण हाच एक मुद्दा चर्चेचा भाग बनला आहे. या मुद्द्यावरूनच बागेश्वर धाम बाबा यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. आज त्यांनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणे त्यांचा हक्क आहे” असे बागेश्वर धाम बाबा यांनी म्हटले आहे. या वक्तव्यामुळे बागेश्वर बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत.
सोमवारी, छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या बागेश्वर धाम बाबांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत असतानाच, “आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे” असे बागेश्वर धाम बाबांनी म्हणले.
त्याचबरोबर, “मनातील गोष्ट वाचता येणे हा एक वेगळा विषय आहे. अधिकारांची गोष्ट करणे, हा एक वेगळा विषय आहे. भारत जेव्हा संकटात होता. तेव्हा आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या जमातीला आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे” असे म्हणत बागेश्वर धाम बाबांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बागेश्वर धाम बाबांच्या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला जात आहे. मात्र तरी देखील सोमवारपासून त्यांचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी बागेश्वर धाम बाबांचे कार्यक्रम आयोजित केली आहे. परंतु बागेश्वर धाम बाबा अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत त्यांच्या या कार्यक्रमांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध दर्शवला आहे.