हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| म्हाडा आणि सिडको (CIDCO) सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे स्वप्नातील घर घेण्यास मदत करते. यात सिडको नवी मुंबई आणि जवळील भागातील घरी आणि व्यावसायिक गाळे खिशाला परवडेल अशा घरांमध्ये उपलब्ध करून देते. परंतु बराच काळ होऊन गेला असताना देखील CIDCO कडून 3322 गृहयोजनेची सोडत काढण्यात आलेली नाही. ही सोडत 19 एप्रिल रोजी निघेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता घरी घेण्यासाठी इच्छुक असतील नागरिक ही सोडत नेमकी कोणत्या तारखेला निघेल याची वाट पाहत आहेत.
मध्यंतरी CIDCO ने 3322 घरांसाठी सोडत जाहीर केली होती . यातील 61 घरे द्रोणागिरी नोड, 251 घरे तळोजा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, 374 घरे द्रोणागिरीतील, 2636 घरे ही तळोजातील सर्वसामान्य घटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. या घरांसाठी अनेक लोकांनी सोडतीचा अर्ज भरला होता. त्यामुळे या सर्व लोकांचे लक्ष प्रलंबित सोडत जाहीर कधी होईल याकडे लागले आहे. आता याबाबत नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही सोडत 7 जून रोजी जाहीर होईल, अशी माहिती CIDCO च्या संकेतस्थळावरून देण्यात आली आहे.
सध्या देशांमध्ये लोकसभा निवडणुकीची कामे सुरू असल्यामुळे सोडत उशिरा जाहीर होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अशा परिस्थितीतच सिडकोच्या संकेतस्थळावरून 7 जून रोजी सोडत जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सिडकोकडून सोडत जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत CIDCO ने थेट सूचना दिल्यामुळे अर्जदारांमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात 7 जून रोजी सोडत जाहीर होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.