Lok Sabha Election: मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीची घोषणा ‘या’ तारखांना होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या संपूर्ण देशाचे लक्ष आगामी लोकसभा निवडणुकीकडे (Lok Sabha Election) लागून राहिली आहे. त्यामुळेच या निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करण्यात येईल याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच या निवडणुकीची घोषणा येत्या 13 किंवा 15 मार्च रोजी करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. या तारखांना लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एक महिन्यात प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मुख्य म्हणजे, देशात आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. यात यंदाची निवडणूक 2019 प्रमाणेच सात टप्प्यांमध्ये घेतली जाईल. यात पहिल्या टप्प्यातील मतदान एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेतले जाऊ शकते. दरम्यान त्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. निवडणुक आयोगाचे अधिकारी प्रत्येक राज्यामध्ये त्यासाठी दौरा करत आहेत. हा दौरा संपल्यानंतरच निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात येईल.

राज्यात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू (Lok Sabha Election)

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे यावर्षीची निवडणूक घासून होण्याची शक्यता आहे. कारण एकाच पक्षातील फुटलेले गट एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारेल हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल.