व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Bigg Boss : सातारच्या अभिजीत बिचुकलेचा आत्महत्येचा प्रयत्न ? किस प्रकरणावरून हैराण

मुंबई | बिग बॉस हिंदीच्या घरात वाइल्ड कार्डद्वारे एंन्ट्री केलेला सातारचा अभिजित बिचुकलेमुळे हा कार्यक्रम मनोरंजक झाला आहे. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरात राखी सावंत, रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले आले. परंतु यामध्ये सातारच्या अभिजित बिचुकलेंने बिग बाॅसच्या घरातील मंडळींना चांगलेच हैराण करून सोडेलेले आहे. स्पर्धेत सहभागी देवोलिनाकडे किसची मागणी अन् नंतर आता विषप्राषन करण्याची इच्छा व्यक्त केल्याने घरातील वातावरण चांगलेच बिघडलेले आहे.

अभिजित बिचुकले वाइल्ड कार्डद्वारे बिग बाॅसच्या घरात सहभागी झाल्यानंतर देवोलिनाकडे किस मागितला. या अजब मागणीमुळे बिग बॉसच्या घरातील सर्व मंडळी अभिजित बिचुकलेच्या विरोधात एकवटली आहे. घरातील सदस्यांनी अभिजित बिचुकलेचा एकप्रकारे बॉयकॉट सुरू केला आहे. दरम्यान, घरात एकटा पडत असल्याचे पाहून बिचुकलेने विषप्राषन करण्याची इच्छा व्यक्त केली.

विषप्राषण करण्याची इच्छा अभिजित बिचुकलेने निशांत जवळ जाऊन सांगितली. तो म्हणाला, वॉशरूममध्ये कुठला कलर आहे का, मी तो खाऊ इच्छितो. कारण गेल्या दोन दिवसांपासून घरामध्ये जे काही होत आहे, त्यामुळे मी वैतागलो आहे. अभिजित बिचुकलेचे हे म्हणणे ऐकू निशांत भट्टला धक्का बसला. त्याने ही बाब शमिता आणि रश्मीला सांगितली. त्यानंतर बिचुकलेच्या मनातील विचार समजल्यावर प्रतीक त्याच्याजवळ गेला. तसेच त्याने अभिजित बिचुकलेला समजावण्याचा प्रयत्न केला.