हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या आपल्या देशात वेगवेगळे प्रकल्प उभारले जात आहेत. वाहतूक आणि दळणवलन ही देशाची चांगली असेल तर देशाच्या प्रगतीला मोठा वेग येतो हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेल्या काही वर्षात भारत सरकार देशाच्या कानाकोपऱ्यात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक विकसित करत आहे. आता तर विमान वाहतूकीकडे सुद्धा सरकारची नजर आहे. त्याचाच भाग म्हणजे भारतात आशिया खंडातील सर्वात मोठं विमानतळ (Biggest Airport In Asia) बनणार आहे. उत्तर प्रदेशात हे विमानतळ उभारण्यात येणार असून या विमानतळामुळे जगात भारताची मान आणखी उंचावेल हे नक्की
एकूण 1 हजार एक्करची आहे जागा
उत्तर प्रदेशमध्ये सर्वात मोठे विमानतळ निर्माण करण्यासाठी तब्बल 1 हजार एक्कर ची जमीन वापरली जाणार आहे. त्यामुळे याचा उल्लेख आशियातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून केला जाईल. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील आहे. हे विमानतळ प्रमुख द्रूतगती मार्गांशी जोडले जाणार आहे. NIAL विमानतळ हे ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन सेंटर स्थापन करणार आहे. या सेंटरमुळे रस्ते, रेल्वे या मार्गाद्वारे विमानतळापर्यंत पोहचणे प्रवश्याला सहज शक्य होणार आहे. तसेच नोएडा आणि दिल्ली विमानतळाला मेट्रो लिंकचा फायदा होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
नोएडा विमानतळ म्हणून ओळखले जाईल विमानतळ
उत्तर प्रदेशमध्ये निर्माण होणाऱ्या या विमानतळास नोएडा विमानतळ म्हणून ओळखले जाईल. हे विमानतळ 2024 पर्यंत तयार होणार आहे. त्यासाठी पावले उचलली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विमान वाहतूक क्षेत्राला चालना देऊ इच्छितात त्या दृष्टिकोनातून या विमानतळाची निर्मिती केली जात आहे. असे सांगण्यात येत आहे.
पर्यटनास होणार फायदा
या विमानतळाच्या निर्मितीमुळे उत्तर प्रदेशचे पर्यटन विकसित होईल. या विमानतळाशी जागतिक पातळीवरील सर्वच देश जोडले जातील. त्यामुळे बाहेरील देशातून येणाऱ्या पर्यटकांस याचा फायदा होईल. तसेच रोजगार निर्मितीतही भर पडेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.