Friday, January 27, 2023

अर्रर्रर्र…बिहारमध्ये शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं! 23 जागांवर उभे केले होते उमेदवार

- Advertisement -

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजप-जेडीयू यांची एनडीए बिहारमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार शिवसेनेची (Shivsena) कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही (NOTA) कमी मतं मिळाली आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेना हिरीरीने उतरली होती. मात्र सेनेला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेच्या ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना o.o4 टक्के मतं मिळाल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीत दिसत होतं.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 1.45 वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने 50 उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली. विशेष म्हणजे राजदचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातही शिवसेना डेंजर झोनमध्ये आहे. म्हणजेच शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.

धनुष्यबाण सोडून तुतारी घ्यावी लागली होती हातात
नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या JDU ने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप घेतला होता. JDU ची निशाणी बाण आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्यबाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो असा JDU चा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने JDU चा आक्षेप ग्राह्य मानत शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही, असे कळवले होते. त्यानुसार सेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्हं मिळालं आहे. (Bihar Election Result 2020 Shivsena got less votes than NOTA in most constituencies LIVE Updates).

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in