Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आरजेडी सोबतची आघाडी तोडून भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले. भाजप आणि जेडीयूकडे पूर्ण बहुमत असल्याने नितीशकुमार याना कोणतीही अडचण येणार नाही असं बोललं जात होते. मात्र आज नितीशकुमार यांच्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावं लागणार असून तत्पूर्वीच बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. बहुमत चाचणीपूर्वी नितीश कुमारांचे ८ आमदार नॉट रिचेबल झाले असून नितीशकुमारांचे टेन्शन वाढलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे NDA मध्ये असलेले HAM चे प्रमुख माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा फोन सुद्धा बंद असल्याची चर्चा सुरु आहे.
जितनराम मांझी काय भूमिका घेणार? Bihar Politics
कालपासूनच बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी (Bihar Politics) पाहायला मिळत आहेत. आरजेडी सोबतची आघाडी तोडून नितीश कुमार हे भाजपसोबत गेले असले तरी जदयू आणि भाजपचे काही आमदार बहुमत चाचणीवेळी तेजस्वी यादव यांना साथ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूचे 5 आणि भाजपचे 3 आमदार संपर्काच्या बाहेर गेले आहेत. त्यातच भर म्हणजे जीतन राम माझी यांचा फोन स्विच ऑफ असल्याने नितीशकुमार बहुमत चाचणी व्यायवस्थित पार करू शकतील हा प्रश्न निर्माण झाला आहे. यांनी राजकीय डावपेच टाकण्यात माहीर असलेले लालू नेमका कोणता डाव टाकतात ते आता बहुमत चाचणीवेळी समोर येईल.
रविवारी जदयू विधिमंडळ गटाची बैठक झाली होती. त्यावेळी जदयूचे बीमा भारती, सुदर्शन, दिलीप राय आणि रिंकू सिंह हे आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे जदयूच्या गोटात अस्वस्थता आहे. दुसरीकडे तेन्स्वी यादव यांच्या निवासस्थानी दोनदा पोलिस पोहोचल्याने आरजेडीच्या गोटात सुद्धा अस्वस्थता पाहायला मिळत आहे, बिहारच्या या सर्व राजकीय हालचालींमध्ये HAM चे प्रमुख जीतन राम मांझी किंगमेकर ठरू शकतात. जीतन राम मांझी नितीश सरकारला फ्लोअर टेस्टमध्ये पाठिंबा देण्यास बांधील नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नितीशकुमार यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.