सातारा- फलटण मार्गावर एसटी बसच्या चाकाखाली दुचाकीस्वार ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण येथील फलटण ते सातारा रस्त्यावर बाणगंगा नदीचे पुलावर मोटारसायकला ब्रेक मारल्याने खडी वरुन मोटार सायकल घसरून एकजण एस. टी. बसच्या मागील चाकाखाली येऊन एकजण ठार झाला आहे, तर एकजण जखमी झाला आहे. या अपघाताची फिर्यादी रूपेश राजेंद्र फरांदे ( वय- 19 वर्षे, रा. फरांदवाडी, ता. फलटण) यांनी दिला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9.15 वाजणेच्या सुमारास फिर्यादी व त्याचे चुलते नवनाथ भिवा फरांदे हे त्यांच्या मोटार सायकल क्रमांक (MH -11 -BF -8544) वरून मुधोजी काॅलेजला निघाले होते. फलटण ते सातारा जाणाऱ्या रस्त्यावर बाणगंगा नदीचे पुलावर समोरून एक वाहन एस. टी. बसला ओव्हरटेक करून मोटार सायकलच्या अंगावर आल्याने फिर्यादी यांच्या चुलते यांनी मोटार सायकलचा ब्रेक दाबल्याने मोटार सायकल खडीवरून घसरल्याने मोटार सायकलसह फिर्यादी यांचे चुलते व फिर्यादी खाली पडून घसरत जावून चुलते नवनाथ फरांदे एस. टी. बसचे पाठीमागील चाकाखाली गेल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी होवून मयत झाले. तर रूपेश हा जखमी झाला आहे.

अपघातानंतर एस. टी बस निघून गेली आहे. सदरचा अपघात मयत नवनाथ भिवा फरांदे यांनी हयगयीने, अविचाराने, निष्काळजापणे मोटार सायकल चालवून व ब्रेक मारल्याने घसरत जावून एस. टी. बसचे पाठीमागील चाक डोक्यावरून गेल्याने ते मयत झाले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.