सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने माफी मागो व जोडे मारो आंदोलन केले जात आहे. त्याचे पडसाद आज साताऱ्यात उमटले. सातारा येथे भाजप कार्यकर्त्याच्यावतीने पाकिस्तानचा ध्वज व मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचा पुतळयाचे दहन करण्यात आले.
भाजप जिल्हाध्यक्ष,आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील पोवई नाका येथे करण्यात आलेल्या निषेध आंदोलनावेळी इशाराही देण्यात आला. यावेळी भाजप नेते धर्यशील कदम यांच्यासह भाजपच्या महिला कार्यकर्त्या व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/400873538860791
पाकिस्तानचे सगळे राजकारणी घाबरले आहेत. भारताला G 20 संघटनेचे अध्यक्षपद मिळाल्याने त्यांचा तिळपापड झाला असून अशातच संपूर्ण जग भारताच्या मागे उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वनेता म्हणून मान्यता मिळालेली असताना त्यांना कमीपणा यावा म्हणून बिलावल यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो तसेच इथून पुढे जर पुन्हा असे बेताल वक्तव्य केले गेले तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नावच पूर्णपणे पुसून टाकले जाईल, असा इशारा धैर्यशील कदम यांनी यावेळी दिला.