हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी आपल्या सहजीवनाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. दोघांनीही आता सामंजस्याने घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे. बिल गेट्स आणि ट्विट करून हि माहिती दिली. तब्बल २७ वर्षाचे सहजीवनाचा ते आता शेवट कारणार आहेत. बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स यांनी सामाजिक जीवनातही अनेक उपक्रम राबवून दोघांनी मिळून काम केल्यामुळे जगाला हे जोडपे परिचित झाले होते. हि माहिती ऐकताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बिल गेट्स यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “आम्ही एकत्र पुढे जाऊ शकतो असे आम्हाला वाटत नाही. बरेच विचारविनिमय करून आणि आमच्या नात्यावर काम करून आम्ही आमचे विवाहित जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 1980 च्या उत्तरार्धात मेलिंडाची भेट झाली जेव्हा मेलिंडा मायक्रोसॉफ्ट कंपनी जॉईन केली होती. दोघांनी मिळून तीन मुलांचा सांभाळ केला. तसेच, दोघे मिळून बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशन चालवतात व यापुढे दोघेही फौंडेशनच एकत्र काम करत राहतील’. असे बिल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
— Bill Gates (@BillGates) May 3, 2021
विल्यम हेन्री बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिध्द कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. ते दानशूर म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी पॉल अॅलन आणि बिल गेट्स या दोघांनी मिळून स्थापन केली आहे. काही काळ ते जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांचे शिक्षण हे हार्वर्ड विद्यापीठातुन झाले आहे. त्यांचे लग्न मिलिंडा यांच्यासोबत 1994 साली झाले होते.