नक्की कधी येणार Corona Vaccine ?? बिल गेट्स म्हणतात…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना व्हायरसने फक्त भारतातच नव्हे तर जगभर विळखा घातला आहे. कोरोनामुळे जगात अनेक माणसे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे कोरोनावर सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे Corona Vaccine म्हणजेच कोरोनावरील लस … कोरोनावरील लस बाजारात कधी येणार याविषयी जगभरात वेगवेगळ्या तारखा जाहीर होत आहेत. पण आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या मते पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत किमान 3 लशी बाजारात येतील.

तसेच रशिया आणि चीनमध्ये तयार होणाऱ्या लशींपेक्षा पाश्चिमात्य देश तयार करत असलेली लस अधिक प्रभावी वाटते, कारण पाश्चिमात्य देशांमध्ये लस निर्मितीपूर्वीच्या चाचण्यांचे निकष अधिक कठोर आणि दर्जात्मक आहेत. त्यामुळे याच लशींकडून जगाला जास्त आशा आहे, असंही गेट्स म्हणाले.

भारताची भूमिका ठरणार महत्वाची –
बिल गेट्स यांच्या मते कोरोना लशीच्या निर्मितीमागे भारताची भूमिका जगात फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण लशीचं संशोधन प्रामुख्याने पाश्चिमात्य देशात होत असलं तरी या संशोधकांबरोबर काही भारतीय कंपन्यांनी लशीच्या उत्पादनासाठीचे करार केले आहेत आणि भारत कोरोना लशीचं उत्पादन करणारा जगातला सर्वात मोठा देश ठरू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

You might also like