औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. यातच आता कोणाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये उद्भवलेल्या त्रुटी लक्षात घेता काही ठिकाणी ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करण्यासाठी साहित्य जमा केले जात आहे. त्याचबरोबर ऑक्सीजन प्लांटसाठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. परंतु याला अपवाद म्हणून सिविल हॉस्पिटल परिसरामध्ये ऑक्सीजन प्लांट रखडला आहे. या ऑक्सीजन प्लांटचे कोट्यावधींची यंत्रसामग्री धूळखात पडून आहे.
सिविल हॉस्पिटल परिसरांमध्ये ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आला होता. त्यासाठी स्वतंत्र वीजपुरवठ्याची लाईन देखील टाकण्यात आली होती. परंतु पैसो सर्टिफिकेट नसल्यामुळे हा कोट्यावधीचा प्लांट बंदच आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सीएसआर मधून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू झाला की 24 तासात 225 जंबो सिलेंडर भरतील एवढ्या ऑक्सिजनची निर्मिती या ठिकाणी होईल. परंतु त्यासाठी स्वतंत्र फिडर व लाईन टाकावी लागणार आहे. यासाठी एमएसईबीकडे बारा लाख दहा हजार रुपये भरले तरीही मागणी पूर्ण झाली नाही आणि हा प्लांट अजूनही सुरू करण्यात आलेला नाही. या प्रकल्पासाठी 2 कोटी 52 लाख रुपये खर्च आलेला आहे.
या सिविल हॉस्पिटलमध्ये 300 बेडसाठी जम्बो सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्याची यंत्रणा उपलब्ध असून सिलेंडर बदलण्याची प्रक्रिया सतत करावी लागत होती. म्हणूनच सिविल हॉस्पिटल परिसरांमध्ये 13 केएल क्षमतेचा ऑक्सीजन टॅंक उभारण्यात आला होता. परंतु तीन महिने होऊनही या ऑक्सीजन टँकचा वापर सुरू झालेला नाही.