Bird Flu Pandemic | कोरोनापेक्षा धोकादायक असेल बर्ड फ्लूचे संकट; तंज्ञानी व्यक्त केली चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bird Flu Pandemic | काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले होते. या कोरोनाच्या संकटातून अजूनही जग पूर्णपणे बाहेर निघालेले नाही. त्यातच आणखी एका महामारीचा धोका उद्भभवत आहे. आता H5N1 म्हणजे बर्ड फ्लू (Bird Flu Pandemic) या महामारीचा प्रसार होण्याची शक्यता आहे. हा आजार कोविड-19 पेक्षाही जास्त घातक असू शकतो. अशी शास्त्रज्ञांनी शंका व्यक्त केलेली आहे.

H5N1 या नवीन स्ट्रेनमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसने त्याच्या प्रसाराबद्दल देखील मोठी चिंता व्यक्त केलेली आहे. बर्ड फ्ल्यू (Bird Flu Pandemic) ही महामारी कोरोनापेक्षा 100 पट वाईट असू शकते, असे देखील न्यूयॉर्क पोस्टने नोंदवलेले आहे. या आजाराने संक्रमित झालेल्या लोकांपैकी निम्म्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो. असे देखील सांगण्यात आलेले आहे. 2003 पासून या आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने जो डेटा गोळा केला आहे. त्यानुसार मृत्यू दर हा 52 टक्के असल्याचे सांगण्यात आलेले आहे. कोविड-19 चा मृत्यू दर यापेक्षा खूपच कमी होता. 2020 पासून ज्या लोकांना झालेला आहे त्यामुळे 30 टक्के लोकांचा मृत्यू झालेला आहे. 887 प्रकरणांपैकी एकूण 462 लोकांचा मृत्यू झालेला आहे. कोविडसाठी सध्याचा मृत्यू दर हा 0.1% पेक्षा कमी आहे.

सस्तन प्राण्यांपासून मानवी संसर्गाचे पहिले प्रकरण | Bird Flu Pandemic

मिशिगनमधील पोल्ट्री सुविधा आणि अमेरिकेतील टेक्सासमधील एका अंडी उत्पादकाने मागील आठवड्यात एवियन फ्लूचा उद्रेक झाल्याची नोंद केलेली आहे. त्याचबरोबर संसर्ग झालेल्या दुग्ध गाईंचे अहवालानी सस्तन प्राण्यांपासून मानवाला ही लागण झाल्याचे देखील प्रकरण समोर आलेले आहे. त्याचप्रमाणे यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनमधील डेअरी फार्म कामगारांमध्ये H5N1 या रोगाची देखील पुष्टी केली आहे.

त्यामुळे जर H5N1 या विषाणूचा प्रभाव वाढला तर यामध्ये मानव जातीला देखील मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होणार आहे. covid-19 मुळे मानवाच्या शरीराचे त्याचप्रमाणे आर्थिक जेवढे नुकसान झाले होते. त्याच्यापेक्षा 100 पटीने नुकसान या रोगांमध्ये होऊ शकते असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे.