फक्त रोहितच नव्हे तर बुमराह- सूर्यकुमार सुद्धा मुंबई इंडियन्सला सोडणार?? रिपोर्ट्स मधून मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 संपल्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार (Rohit Sharma To Leave Mumbai Indians) अशा बातम्या काल प्रसारित झाल्या. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या कामगिरी वर रोहित खुश नाही, त्यामुळे तो मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चानी मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता आणखी एक बातमी समोर आली आहे. फक्त रोहित शर्माच नव्हे तर जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे सुद्धा मुंबईची साथ सोडणार असल्याचे एका रिपोर्ट मधून समोर आलं आहे.

खरं तर रोहित शर्माला मुंबई इंडियन्समध्ये 14 वर्षांचा, सूर्यकुमार यादवला 9 वर्षांचा आणि जसप्रीत बुमराहला 12 वर्षांचा अनुभव आहे. मात्र हार्दिक पांड्या आणि टीम मॅनेजमेंटमधील मतभेदांमुळे रोहित शर्मा फ्रँचायझी सोडण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद पुन्हा रोहितकडे सोपवले जाऊ शकते, अशा बातम्याही आल्या आहेत, परंतु ड्रेसिंग रूममधील बदलते वातावरण पाहता रोहितने आधीच आपला निर्णय घेतल्याचे दिसते. रोहित शर्मा हा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार असुंन त्याने आपल्या नेतृत्वाखाली तब्बल ५ वेळा मुंबई इंडियन्सला आयपीएलचे चॅम्पियन केलं आहे. मात्र तरीही यंदा मुंबईच्या मॅनेजमेंटने रोहित ऐवजी हार्दिकला कर्णधार केल्याने सर्वत्र नाराजी पसरली होती.

रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने कर्णधार केल्यानंतर मुंबई इंडियन्स च्या कॅम्प मधील वातावरण बिघडलं आहे. फ्रॅन्चायजीचा हा निर्णय चाहत्यांना सुद्धा पटलेला नसून मुंबईच्या प्रत्येक सामन्यात हार्दिक विरोधात नारेबाजी पाहायला मिळत आहे. तर मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी करत रोहितचे चाहते स्टेडियम दणाणून सोडत आहेत. या एकूण सर्व परिस्थितीचा परिणाम संघाच्या सांघिक कामगिरी वर होत असून मुंबईच्या संघाने आपले पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. आता बाकी सामन्यात चांगला परफॉर्मन्स करून मुंबईचा संघ आयपीएलमध्ये कमबॅक करणार का ते पाहायला हवं.