पुण्यात कोयत्याने केक कापणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील 4 तरुणांना आपली हिरोगिरी चांगलीच महागात पडली आहे. या तरुणांनी मुंढव्यातील केशवनगर भागातील राजमाता जिजाऊ चौकात आपल्या वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. वीरेंद्र बाजीराव सस्ते, शशांक श्रीकांत नागवेकर, समीर विश्वजीत खंडाळे, सुखविंदरसिंग पप्पूसिंग टाक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी रमेश उगले यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी वीरेंद्र सस्ते याने त्याच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमावर एक ग्रुप तयार केला आहे. वीरेंद्र सस्ते याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे साथीदार केशवनगर भागातील राजमाता जिजाऊ चौकात सायंकाळी जमले. यानंतर सस्ते आणि त्याच्या साथीदारांनी भरस्त्यात कोयत्याने केक कापून परिसरात दहशत निर्माण केली.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील चौघांना अटक केली आहे तर त्यांच्याबरोबर असेलेले बाकी साथीदार घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment