एलन मस्कचे ट्विटही बिटकॉइनला तारण्यात ठरले अपयशी, किंमती 10% ने घसरल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेला बिटकॉईन (Bitcoin) गुरुवारी 10 टक्क्यांनी खाली आला. ज्यामुळे आता ते 57,000 डॉलर्सवरून घसरून 51,000 वर गेला. बिटकॉइनमधील ही घट तेव्हा झाली आहे जेव्हा इलेक्ट्रिक कार बनविणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचा संस्थापक एलन मस्क यांनी अलीकडेच ट्विट केले की,”ग्राहकांना आता बिटकॉइनद्वारे टेस्ला कार खरेदी करता येतील.”

जेरोम पॉवेल यांच्या विधानाने बिटकॉइनची हवा गेली
अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या विधानामुळे बिटकॉइनला हवा गुल झाली आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पॉवेल यांच्या विधानानंतर, बिटकॉईनच्या किंमती एका झटक्यात 10 ते 15 टक्क्यांनी घसरल्या. गुरुवारी बिटकॉईनची किंमत सुमारे 15 टक्क्यांनी घसरून 52,250 डॉलरवर गेली.

पॉवेल म्हणाले होते की,” जगातील सर्वात जुनी क्रिप्टोकरन्सी त्याच्या अस्थिरतेमुळे पेमेंट देण्यासाथीचे योग्य माध्यम नाही आहे, म्हणून लोकांना हे समजले पाहिजे की,त्यामध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक आहे.’ ते असेही म्हणाले की,”क्रिप्टोकरन्सी डॉलरऐवजी सोने पर्याय असू शकेल.”

टेस्लाने गुंतवणूक करताच बिटकॉइन मध्ये मजबूत वाढ झाली होती
अलीकडेच, टेस्लाने क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली, म्हणून त्याच्यात होणारी वाढ थांबण्याचे नाव घेत नव्हती. टेस्लासह अनेक कंपन्यांनी बिटकॉइनला डिजिटल चलन म्हणून मान्यता दिली आहे. टेस्ला व्यतिरिक्त दिग्गज विमा कंपनी मास-म्युच्युअल, एसेट मॅनेजर गॅलेक्सी डिजिटल होल्डिंग, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सीची पेमेंट कंपनी स्क्वायर यांनीही बिटकॉइनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्याचे दर गगनाला भिडले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group