पॅनला आधारशी लिंक करणे आता पडणार महागात, ठोठावला जाणार दंड

pan -adhar link
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. आयकर विभागाने यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत दिली आहे. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत पॅन आणि आधार लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड डी-ॲक्टिव्हेट केले जाईल. यामुळे तुम्हाला कर भरणे, व्यवहार करणे आदींसह इतर अडचणींना सामोरे जावे लागेल.

पॅन-आधार लिंक करण्यासाठी दंड

30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची सुविधा मोफत करण्यात आली होती. मात्र, आता विलंब शुल्क म्हणून एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी दंडाची रक्कम 500 रुपये होती, ती आता 1000 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच आधार कार्ड पॅनशी लिंक केल्यानंतर तुम्हाला आता 1,000 रुपये दंड भरावा लागेल.

किती जणांना ठोठावला दंड ?

मोफत मुदत संपल्यानंतर २ कोटींहून अधिक करदात्यांनी पॅनला आधारशी लिंक केले. सरकारने त्यांच्याकडून 2,125 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले आहेत. आयकर कायदा, 1961 च्या कलम 234H मध्ये तरतूद आहे की एखाद्या व्यक्तीने कलम 139AA च्या उप-कलम (2) अंतर्गत आधारची माहिती द्यावी. तसे न केल्यास त्या व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंतचा दंड सरकारला भरावा लागेल.

आधारशी पॅन लिंक कसे कराल ?

  • आयकर वेबसाइटला भेट द्या – eportal.incometax.gov.in किंवा incometaxindiaefiling.gov.in वर क्लीक करा.
  • युजर आयडीच्या जागी पॅन क्रमांक भरून नोंदणी करा.
  • आता पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी एक पॉप विंडो दिसेल.
  • असे न झाल्यास प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊन आधार लिंकवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला पॅन कार्ड माहिती जसे की जन्मतारीख, लिंग आणि नाव दिसेल.
  • ही माहिती आधारशी जुळवा. त्यानंतर Link Now बटणावर क्लिक करा.
  • यानंतर, तुमच्या स्क्रीनवर असे लिहिले जाईल की तुमचा पॅन आधारशी लिंक झाला आहे.