खंबाटकी बोगद्यात पाच वाहनांचा विचित्र अपघात, एकजण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | खंबाटकी बोगद्याजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रक, दुचाकी आणि तीन चारचाकी वाहनांची धडक झाली. या दुर्घटनेत एकजण जागीच ठार झाला आहे. तर 11 जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खंबाटकी बोगद्याजवळ धोमबलकवडी कालव्याजवळ दुचाकीस्वार सचिन कैलास गिरमे (रा. सासवड जि.पुणे) यांच्या अंगावर पाठीमागून येणारा मालट्रक गेल्याने तो जागीच ठार झाला. दरम्यान, काही वेळात उतारावरून भरधाव वेगात आलेला मालट्रकने क्रमांक (KA- 27 – A – 9019) डस्टर, क्रेटा व इर्टिका कारला धडक दिली. यामध्ये क्रेटा कारचा पूर्ण चक्काचूर झाला. खंडाळा व महामार्ग पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. जखमी सहा जणांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले.

दिवाळी सुट्टी संपल्याने पुणे, मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या महामार्गावरील लेनवरती वाहनांची गर्दी झाली आहे. अपघात स्थळापासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व जखमी खराडी (पुणे) येथील आहेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. जखमी लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांनी मदत केली.

Leave a Comment