कराड शहरात काॅटेज जवळ तिन वाहनांचा विचित्र अपघात, दोनजण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरात स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयाजवळ असलेल्या महेंद्र ज्वेलर्ससमोर एका चारचाकी चालकाने रिव्हर्स गाडी घेताना एका दुचाकीसह चारचाकीलाही जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका लहान मुलीसह दोनजण जखमी झालेले आहेत. तर अपघातातील तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- विटा मार्गावर टाऊन हाॅल ते काॅटेज या दरम्यान रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जोरदार अपघात झाला. या अपघातात एक चारचाकी महेंद्र ज्वेलर्स येथे पार्किंग केलेली होती. चालक ती गाडी पाठीमागे रिव्हर्स टाकून घेत होता. यावेळी रिव्हर्स गाडी येताना पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना जोराची धडक दिली. या वाहनांच्या धडकेमुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.

कराड शहरात झालेल्या या अपघातात एक दुचाकी क्रमांक (एमएच-11-बीएन-2786) आणि इनोव्हा चारचाकी गाडी क्रमांक (एमएच-42-के-7277) आणि चारचाकी गाडी क्रमांक ( एमएच-12-एफएफ- 5452) या तिन गाड्यांचा अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरील मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. तर अन्य एकजण जखमी झाला आहे. घटनास्थळावर वाहतूक पोलिसांनी धाव घेत पाहणी केली आहे. तसेच वाहतूक सुरळीत केलेली आहे.