हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Local Government Elections) वारे वाहू लागले आहेत. यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आता आम्हीही स्वबळावर लढायला तयार आहोत, अशी भूमिका शिवसेना (Shivsena) पक्षाने घेतली आहे. आता हे दोन्ही पक्ष आपापल्या बाजूने आगामी निवडणुकांसाठी तयारी करत आहेत.
स्वबळाचा नारा देत संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हणले आहे की, “बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्था भाजप स्वबळावर लढेल असं वाटत नाही, असे शिवसेना नेते मंत्री उदय सामंत म्हणाले. तर भाजप स्वबळावर लढले तर आम्हीही स्वबळावर लढू” सर्वात पहिल्यांदा भाजप पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर महायुतीतील नेत्यांनी देखील स्वभावाचा नारा उचलून धरला. तर शिवसेनेच्या नेत्यांनी देखील ही निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी केली.
महत्वाचे म्हणजे, शिवसेनेच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा ताकदीनं दिलाय. तर महायुतीनं एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जावं, यावर भर देणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेकदा स्वबळाची भाषा वापरली जाते, असा टोला देखील भाजपकडून मित्रपक्षांना लगावण्यात आला आहे. परिणामी यामुळे महायुतीमध्ये फूट पाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकांचे अनिश्चित भवितव्य
राज्यातील 29 महापालिका आणि 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप रखडलेल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड यांसारख्या मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची स्वबळाची भाषा आगामी राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकते.
महायुतीत फूट पडणार??
दरम्यान, महापालिका निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी महायुतीतील मतभेद अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, भाजप स्वबळावर जाण्याचा विचार करत आहे, तर शिवसेना शिंदे गट आणि इतर घटक पक्षही स्वतःची ताकद अजमावण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर महायुती एकत्र राहते की विभक्त निवडणूक लढवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




