भाजपने जाहीर केली भावांतर योजना; शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार

Farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक वेळा शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारामध्ये चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला बाजार भाव न मिळाल्याने शेतीसाठी आलेल्या खर्च देखील त्यांना निघत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण जगाचे पोट भरणारा हा अन्नदाता एक वेळ उपाशी राहून शेतात काबाड कष्ट करत असतो. असेच जातात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. भावांतर योजना या नावाने ही योजना राबवली जाणार आहे.

त्याचप्रमाणे भाजपने शेतकऱ्यांना सत्तेमध्ये आल्यावर संपूर्ण कर्जमाफी देणार आहे, असे देखील सांगितलेले आहे. तसेच सध्या देण्यात आलेली मोफत कृषी पुरवठा योजना देखील पुढील पाच वर्षासाठी चालू राहणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. या आधी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपला खूप मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा विचार करून त्याचा फायदा करून देण्याचा प्रयत्न भाजपकडून चालू झालेला आहे

भाजप किसान मोर्चाच्या सरचिटणीस संदीप दिघे यांनी याबाबत त्यांचे मत व्यक्त केलेले आहे. त्यांनी सांगितले की, महायुती सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नवीन योजना चालू केलेली आहे. भावांतर ही योजना चालू केलेली आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी 5000 पर्यंत मदत मिळाली आहे. तसेच 27 हजार कोटी रुपये 62 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूज कमी होणार आहे. आणि त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देखील मिळणार.

भाजपच्या संकल्प पत्रातून शेतकऱ्यांना देण्यात आलेले आश्वासने

  • सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार
  • शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवली जाणार
  • शेतकरी सन्मान निधीत वाढ करून 15 हजारांपर्यंत केली जाणार
  • राज्य व वस्तू कर अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे
  • सोयाबीनला 6000 रुपयांचा भाव देणार, तसेच मूल्य साखळी उभारणार