हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी सुरू असतानाच शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याने वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजप नेते अवधूत वाघ यांनी यावरून अनिल परब यांना डीवचण्याचा प्रयत्न केला आहे.
अवधूत वाघ यांनी ट्विट करत म्हंटल की, ईडीने दिलेली नोटीस सुडबुध्दीने… मात्र ‘घ्या रे त्याला आत’ मात्र प्रेमाने….. ऐसा कैसा चलेगा अनिल?’ असा सवाल त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून विचारला आहे.
ED ने दिलेली नोटीस सुडबुध्दीने… मात्र
"घ्या रे त्याला आत" मात्र प्रेमाने
ऐसा कैसा चलेगा अनिल?— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) August 29, 2021
दरम्यान, मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.
ईडी नोटीस नेमकी कशासाठी-
अनिल परब यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.