हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि शिवसेना यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला.
पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं.भाजपा आपल्यासोबत प्रामाणिकपणे राहिलेल्यांच्या आधारे व संघटन वाढवून सरकार आणेल, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही-
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संपणार की नाही? असा प्रश्न केला असता ओबीसींना आरक्षण देणं खूप सोपं आहे. पण या सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, असा आरोप त्यांनी केला. भाजपने परिवहन मंत्री अनिल परब यांचे नवे घोटाळे काढलेले नाहीत. जुनेच घोटाळे आहेत, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.