हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप आणि मनसे यांच्या आघाडीच्या शक्यतेने जोर धरला आहे. दरम्यान नाशिक येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीची शक्यता वाढली आहे. मात्र राज ठाकरेंनी परप्रांतीय विरोधी भूमिका बदलली तर त्यांचं स्वागत आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.
ठाकरे आश्वासक चेहरा आहे. परंतु, त्यांनी परप्रांतीय विरोधी भूमिका बदलली तर भाजपकडून त्यांचं नक्कीच स्वागत आहे. आम्ही त्यांच्या सोबत येऊ शकतो. पण यावर फक्त चर्चा असून निर्णय मात्र पक्ष मंथन करूनच घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
राजकारण आणि समाजकारणात दोस्ती वेगळी आणि व्यवहार वेगळा असतो. व्यवहारात आमचे निर्णय राज्याची टीम घेत असते. मी राज्याचा अध्यक्ष आहे. पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात असेही त्यांनी म्हंटल.