आमच्या नानांसमोर तुम्हाला फेस आला, मी लढलो असतो तर…; चंद्रकांतदादांचे पुन्हा चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा मोठा पराभव केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांच्या हिमालयाच्या विधानावरून विरोधकांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनतर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार करत मी अजून लढलोच नाही असे म्हंटल आहे. मी लढलो असतो तर तुमचं काय झालं असत असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना आव्हान दिले आहे

मी असं म्हटलं होतो की मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जाईन, मी अजून लढलोच नाही ना. आमचे नाना लढले. आमचे नाना कदम समोर होते तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. तसेच या निवडणुकीत नागरिकांनी दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे असेही त्यांनी मान्य केले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/557992102243282/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C

२ वर्षांपूर्वी चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते

दोन वर्षांपूर्वी एका सभेत बोलताना चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चॅलेंज दिलं होतं. “कोल्हापूरमधून हे पळून आले आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला कुणाला वाटतं त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा, पोटनिवडणूक लावायची, निवडून नाही ना आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले

Leave a Comment