अरे, तुमच्या बापाची पेंड आहे का ?? चंद्रकांत पाटलांनी पुन्हा काढला ‘बाप’

0
77
Chandrakant Patil
Chandrakant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना आम्ही पण तुमचे बाप आहोत असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता पुण्यात ट्रॅक्टर रॅलीचा समारोप करताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा ‘बाप’ काढला आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं, समितीच्या आवाराच्या बाहेर शेतमात विकणाऱ्यांकडून सेस गोळा करू, असा आदेश काढला. या निर्णयावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी, यांच्या बापाची पेंड आहे का? असा सवाल केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा ट्विट करून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. वाचाळवीरांना उद्योग नसले की असे उपद्व्याप सूचत असतात. महाराष्ट्रविकासआघाडी सरकार काम करत असताना फक्त प्रसिद्धी मिळवण्याकरिता  बाप, माय असे शब्द वापरणारे कोल्हापूरकरांनी का नाकारले ते आता कळायला लागले. विकासाचा सूर्य उगवल्यामुळे “चंद्र” कायमचा मावळतीला जाणार, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

ट्रॅक्टर रॅलीचा समारोप सभेवेळी चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा विरोधकांचा बाप काढला. या विधेयकाला स्थगिती दिल्यावर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने लगेच फतवा काढला की बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकणाऱ्यांकडून आम्ही सेस गोळा करु  नाही म्हणून. अरे बापाची पेंड आहे की काय तुमच्या? कोणतरी स्थगिती देतं, कोणीतरी पत्र देते, शेतकरी राजाला हे कळत नाहीए का?, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here