आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या; चंद्रकांतदादांनी डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय प्रचाराचा धुरळा उडत असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा थेट सामना आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल. भाजपने काल च शिवसेनेचे माजी … Read more

वेळ आली तर हसन मुश्रीफांना मलाच विकावं लागेल: चंद्रकांत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील हाडवैर जगजाहीर आहे. चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा चंद्रकांत पाटलाना दिला होता. त्यावर पाटील यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे. हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी … Read more

तुमच्या ‘त्या’ देदीप्यमान कामगिरी मुळेच कोल्हापूर सोडून पुण्यात निवडणूक लढावी लागली- रुपालीताई चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. कोल्हापूर महापुरातील तुमच्या देदीप्यमान कामगिरी मुळेच तुम्हांला पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांनी केली. चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी … Read more

एकत्र लढून पराभव, वेगवेगळे लढले तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही – चंद्रकांतदादांचे महाविकास आघाडीला आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्या कडून भाजपचे पानिपत झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर पोटनिवडणुक निकालाचा आधार घेत महाविकास आघाडीच्या नेत्यानाच खडेबोल सुनावलं आहेत. हे सर्व जर वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात … Read more

समाधान अवताडेंचा विजय हा महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा दणदणीत पराभव केला. यामुळे महाविकास आघाडीत जोरदार धक्का बसला. तिन्ही पक्ष एकत्र येऊन देखील भाजपने बाजी मारल्यानंतर भाजप नेत्यांना उत्साह वाढला आहे. या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास … Read more

मला चंपा म्हणणं थांबवा, अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील प्रचारसभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख पुन्हा एकदा चंपा असा केल्याने चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत अजित पवारांना इशारा दिला आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं … Read more

ठाकरे सरकार कधी व कसं पडणार हे अजितदादांना चांगलं ठाऊक आहे: चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित असून तो कधी होणार हे अजित पवार यांना चांगलं ठाऊक आहे. ठाकरे सरकार कधी आणि कस पडणार हेही अजितदादांना ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. विझण्यापूर्वी दिवा जसा मोठा होता, त्याप्रमाणे सध्या महाविकासआघाडीची फडफड सुरु आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. … Read more

आधी व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका मग लॉकडाऊन करा : चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट बनत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार आहे. तशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलीय. त्यावर भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करु, पण आधी राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट … Read more

हिंमत असेल तर उद्धव ठाकरे अजितदादांवर कारवाई करणार का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी सोलापुरात मात्र अजित पवारांच्या सभेत जोरदार गर्दी केली होती. यावरून भाजपा आक्रमक झाली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवारांवर कारवाई करणार का असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका अर्थाने मोगलाई आली आहे….हम करे … Read more

चंद्रकांत पाटलांना चोंबडेपणा करण्याची गरज काय?; हसन मुश्रीफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सध्या चांगलंच टीकेचं रान पेटलं आहे. दोघेही दररोज एकमेकांवर कोणत्याना कोणत्या कारणाने टीका करीत असतात. रविवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्यावरून कोल्हापुरात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच भडकले. त्यानंतर चंद्र्कांत पाटील यांनीही मुश्रीफ यांचा खरफुस समच्छर घेत त्यांना … Read more