महाराष्ट्रात मंत्र्यांची नावे घेऊन आत्महत्या, हि तर शोकांतिका; भाजप नेत्याची ठाकरे सरकारवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर सध्या भाजपमधील नेत्यांकडून अनेक कारणांनी टीका केली जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री तथा शिवसेनेचे नेते शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित एका संस्थेतील कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने मंत्री गडाख आणि त्यांचे बंधू विजय गडाख यांची नावे घेतली आहेत. यावरून भाजप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये पत्रकार परिषदेत म्हणाले की, महाराष्ट्रात सेनेच्या मंत्र्यांची नावे घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडत असेल आणि गडाख यांची चौकशी होत केली जात नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. कामगाराच्या हत्येला गडाख जबाबदार आहेत. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

या ठाकरे सरकारला आमची आता एकच मागणी आहे की, प्रतिक काळे या कामगाराने आत्महत्या केली आहे. त्याने आत्त्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला आहे. त्यामध्ये अनेक नावे घेतली आहेत. आता प्रतीक काळे याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होणे गरजेची आहे.

प्रतीक काळेला न्याय द्यायचा असेल तर शिवसेना मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजुला करावे. नाव घेऊनही कारवाई का होत नाही? असा सवाल उपाध्ये यांनी यावेळी केला आहे.

Leave a Comment