कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
करवडी गावातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या कामावर विश्वास ठेवल्याने येथे विविध कामे होत आहेत. भविष्यातही करवडीसह संपूर्ण कराड उत्तरमध्ये विकासासाठी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केले. पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार यांच्या निधीतून मंजूर कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी श्री. वेताळ बोलत होते.
यावेळी कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, वर्धन ऍग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम, माजी जि. प. सदस्य सागर शिवदास, माजी पं. स. सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, सूर्यकांत पडवळ, सरपंच शालन पिसाळ, उपसरपंच राहुल शेवाळे, शंकर पिसाळ, विरवडे उपसरपंच सागर हाके, संजय पिसाळ, संभाजी पिसाळ, दिनकर पिसाळ, प्रल्हाद भोसले, प्रताप पाटील, शैला कुंभार, संजय कावरे, अकबर बागवान,विक्रम पिसाळ,दत्तात्रय पिसाळ, सोमनाथ पिसाळ यांच्यासह करवडीचे ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, करवडी गावाने नेहमी भारतीय जनता पार्टी ची सोबत केली आहे. त्यामुळे या गावाला भरीव विकास निधी आज पर्यंत मिळाला आहे. यापुढेही या गावच्या विकासासाठी नेहमी कटीबद्ध राहून विकासनिधीचा ओघ कायम राखू. मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांनीही सुरेश कुंभार यांच्या कामाचे कौतुक केले तसेच गावासाठी भरीवनीधी देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रस्तावित सुरेश कुंभार यांनी केले तर आभार सोमनाथ पिसाळ यांनी मानले.
करवडीत विविध विकासकामांचा शुभारंभ
पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी समोर पेवर ब्लॉकबसवणे, ग्रामपंचायत रोजगार हमी योजनेतून संरक्षक भिंत, शौचालय, पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, मागासवर्गीय वस्ती रस्ता काँक्रिटीकरण, वॉटर एटीएम भूमिपूजन, कुंभारवाडा ते वसंत जेधे यांच्या घरापर्यंत च्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि गटर बांधकाम अशा विविध कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.