सांगली/जळगाव | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुका भाजप जिंकेल का असा सवाल सर्वत्र विचारला जात होता या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे. निवडणुकांचे कल हाती येऊ लागले असून सांगलीत भाजपा ०७ तर कॉग्रेस/राष्ट्रवादी ०८ जागी आणि १ अपक्ष आघाडीवर आहेत.तर तिकडे जळगावात भाजप ०४, शिवसेना ०२ जागी आघाडीवर आहे.
सांगली कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजपने सांगली शहराचे घर नी घर पिंजून काढत आघाडीला जोरदार लढत दिली आहे. तर तिकडे सुरेश जैन यांच्या वर्चस्वाला भाजपाने धक्का देण्यासाठी कंबर कसली होती त्याचे फळ आज मिळताना दिसत आहे. सांगलीच्या ७८ जागांचे निकाल दुपारी २ वाजे पर्यंत लागतील असे मतमोजणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर जळगावची मतमोजणी धीम्या गतीने सुरू असल्याचे समोर येत आहे.