शिवसेनेवर टीका करण्यासाठी भाजपने बुजगावणे पुढे केले : नारायण राणेंवर विनायक राऊतांचे टीकास्त्र

narayan rane vinayak raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी | बाडगा असतो तो कोडगा असतो. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजपने बुजगावणे पुढे केले आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केला आहे.

विनायक राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन आशीर्वाद यात्रा ही लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी करण्यास सांगितली होती. परंतु पंतप्रधानाच्या आवाहनाला नारायण राणेंनी हरताळ फासला आहे. राणेंनी जन आशीर्वाद यात्रेतून लोकांचे किती प्रश्न समजवून घेतले?, राणेंची यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे तिसरी लाट कोकणात घेऊन येत आहेत.

एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक

स्वतः च्या स्वार्थासाठी शिवसेनेशी बेईमानी केलेल्या राणेंना इतर लोकही तसेच दिसतात. त्यामुळेच राणेंनी एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेले असून त्यांना आम्ही भाजपमध्ये घेवू असे म्हटले होते. परंतु एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक असून ते मंत्रीपदाला न्याय देत आहेत. पक्ष संघटना सुद्धा मजबुत करण्याचे काम करत आहेत, असं सांगतानाच स्वतःच्या स्वार्थी अनुभवावरून इतरांना मोजणे हा नारायण राणेंचा गुणधर्म आहे, अशी टीका खा. विनायक राऊत यांनी केली.