Saturday, March 25, 2023

वसुलीमंत्री अनिल देशमुखांनी ताबडतोब राजीनामा दिलाच पाहिजे – भाजपा आक्रमक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, यामुळे विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लावून धरली आहे.

महाराष्ट्र गृहमंत्री राजीनामा का देत नाहीत? आमची ही देखील मागणी आहे, हे जे वसुली रॅकेट आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी महाराष्ट्र सरकार चालवत आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काय जबाबदारी आहे? ते आतापर्यंत काही बोलले का नाही? हे भ्रष्टाचारी सरकारला एक मिनिट देखील सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. अस भाजपने म्हंटल आहे.

- Advertisement -

तसेच या भ्रष्ट ठाकरे सरकारविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आणि अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यासाठी उद्या राज्यभर भाजपा आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सहभागी व्हा ! असे आवाहन भाजप कडून करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group