छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर का बोलत नाहीत ; फडणवीसांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असून ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे विरोधी पक्ष भाजप कडून ठाकरे सरकार वर निशाणा साधला जात आहे. आता याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर टीकास्त्र सोडलं आहे.

छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत. तपास नेमक्या दिशेने सुरु आहे, हे राज्यातील जनतेला गृहमंत्री नेमकं का सांगत नाहीत?, त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज नेमका कुणाचा आहे हे पोलिस का सांगत नाहीत किंवा पडताळून का पाहत नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीसांनी गृहमंत्र्यांवर केली.

दरम्यान, संजय राठोड प्रकरण असो की वीज कापण्याचं असो, विरोधी पक्ष आक्रमक राहील, असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला आहे. अशा प्रकरणात उघडं पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची टीका त्यांनी केली आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकारला काही देणंघेणं नाही. बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीवरुन वॉकआऊट करत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment