‘या’ राज्यातील भाजप सरकारवर अस्थिरतेचं संकट; काँग्रेस सत्तास्थापनेच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुवाहाटी । मणिपूरमधील भाजपचे मुख्यमंत्री एम. बिरेन सिंह सरकारवर अस्थिरतेचं संकट घोंगावू लागलं आहे. तीन वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये सत्तेत आलेलं भाजपप्रणित सरकार अडचणीत आलं आहे. बुधवारी भाजपच्या ३ आमदारांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर इतर ६ आमदारांनी पाठिंबा काढून घेतला आहे. राष्ट्रीय जन पक्षाचे ४, तृणमूल काँग्रेस १ आणि एका अपक्षाने पाठिंबा काढत काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं मणिपूर राज्यात काँग्रेस सत्तास्थापनेच्या तयारीला लागली आहे.

विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी काँग्रेसकडून राज्यपालांना विनंती केली जाणार आहे. दरम्यान, सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा मणिपूरचे उद्योगमंत्री बिस्वजित सिंग यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर भाजपच्या घसरणीचा काळ इंफाळमधून सुरू झाला असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. मणिपूरमध्ये लवकरच काँग्रेसच्या नेतृत्त्वात जनतेच्या हिताचं सरकार स्थापन केलं जाईल, असं काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितलं. आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओक्रम इबोदी सिंग हे मणिपूरचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असा विश्वास काँग्रेसकडून बोलून दाखवण्यात आला आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. काँग्रेसचे २८, तर भाजपचे २१ आमदार होते. नंतर काँग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षाला रामराम केला होता. गेल्या वर्षी काही आमदार आणि मंत्र्यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याविरोधात मोहिम उघडली. ते बाहेरचे असल्याचा दाखला यासाठी देण्यात आला. नुकतंच मणिपूर मंत्रिमंडळाचा विस्तार करत मणिपूर नागा फ्रंटचे अध्यक्ष अवांगबो नेवमाई यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं.

राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या चिंतेत वाढ
मणिपूरमध्ये १९ जूनला राज्यसभा निवडणूक होत आहे. नुकतंच मणिपूर हायकोर्टाने काँग्रेस सोडलेल्या ७ आमदारांना मतदानासाठी विधानसभेत जाण्यापासून रोखलं होतं. पुढील आदेश येईपर्यंत या आमदारांना विधानसभेत जाता येणार नाही, असं कोर्टाने म्हटल होतं. यापूर्वी मार्चमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मंत्री असलेल्या एका आमदाराने राजीनामा दिला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

 

Leave a Comment