हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) जवळ आली असताना हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे.मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्याबरोबर संपूर्ण मंत्रिमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा भाजप नेते आणि अपक्ष आमदारांमध्ये झालेल्या बैठकीनंतर राजभवनात जाऊन सुपूर्द केला आहे. आता भाजप अपक्ष आमदारांना घेऊन नवे सरकार स्थापन करणार आहे. यात निवडणुकीपूर्वी भाजप-जेजेपी (BJP – JJP) युती तुटल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
भाजप-जेजेपी युती तुटल्यानंतर आता मनोहरलाल खट्टर यांच्या जागी एका दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात येणार आहे. या नेत्यांमध्ये नायब सैनी (Nayab Singh Saini) यांचे नाव केंद्रस्थानी आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, खासदार नायब सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. आज विधीमंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांचे पुष्प देऊन अभिनंदन केले आहे.
आज सायंकाळी ठीक 5 वाजता नायब सैनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र नायब यांना मुख्यमंत्री बनविण्यावर
गृहराज्यमंत्री अनिल विज यांनी आक्षेप नोंदविला आहे. विज हे 6 वेळा आमदार झाले असले तरी त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, हरियाणा विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. यात दुष्यंत चौटाला यांच्यापेक्षा शिवाय भाजप सरकार स्थापन करू शकणार आहे. त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने हालचाली वाढवल्या आहेत.
नायब सैनी कोण आहेत?
नायबसिंग सैनी अंबाला येथील मिर्झापूर माजरा येथील रहिवासी आहेत. नायब सिंग सैनी यांच्याकडे एकूण 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे. सर्वात प्रथम ते 2002 मध्ये युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हा सरचिटणीस बनले होते. पुढे ते 2005 मध्ये अंबाला येथील युवा मोर्चा भाजपचे जिल्हाध्यक्ष बनले. 2012 साली ते अंबाला येथून भाजपचे जिल्हाध्यक्ष बनले. पुढे 2014 साली ते नारायणगड विधानसभेतून आमदार झाले. 2016 मध्ये ते हरियाणा सरकारमध्ये राज्यमंत्री देखील राहिले. याचवेळी ते 2019 मध्ये कुरुक्षेत्रमधून खासदार म्हणून निवडून आले.