हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारावर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याचे आवाहन केलं. दरम्यान या लेटरबॉम्ब नंतरही भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक याना इशारा दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हंटल, शिवेसेना आमदार प्रताप सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे. सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच,” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
शिवेसेनाचे आमदार प्रताप सरनाईक " जेल" चा भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि
आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे
सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर …. जेलचे पाहुणे होणारच pic.twitter.com/2wOY5gN8bd
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 20, 2021
प्रताप सरनाईक पत्रात नेमकं काय म्हणाले-
भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.