उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे ; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

0
75
Uddhav Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक कुटुंबाला पुढे करून उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे पैशांची अफरातफर करत आहेत. उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे, तुम्हाला सगळे हिशोब द्यावेच लागतील असा थेट इशारा भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना दिला आहे.

रश्मी ठाकरे यांनी आठ वर्षे कर भरलेला नाही. नाईक कुटुंबीय जमिनीची खरेदी-विक्री हा आमचा व्यवसाय असल्याचा दावा करत आहेत. ही गोष्ट चांगली आहे. पण ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे, याविषयी कोणीही बोलत नाही. नाईक परिवाराला पुढे करून ते पैशांची अफरातफर करत असतील तर मला बोलावेच लागेल. असे किरीट सोमय्य म्हणाले.

ज्याने कोणी चोरीचा पैसा घेतला आहे तो परत द्यावाच लागेल. उद्धव ठाकरे यांची गाठ किरीट सोमय्याशी आहे. त्यांना सगळे हिशेब द्यावेच लागतील, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here