मुसलमान असण्याच्या संशयावरुन मानसिक रुग्णाला मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रतलाम : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील रतलाममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मानसिक विकलांग असलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला मुसलमान असल्याच्या संशयावरुन केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. एका भाजपा (BJP) नेत्याने हि मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. भंवरलाल असे या मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांची आई 85 वर्षांची महिला सरपंच आहे. तर भवरलाल यांचा भाऊ भाजपाचा (BJP) कार्यकर्ता आहे. भवरलाल यांचे कुटुंब, महिला सरपंचासह चित्तोडगड येथे 15 मे रोजी पूजेसाठी गेले होते. 15 मे रोजी पूजा झाल्यानंतर भंवरलाल बेपत्ता झाले. आता गुरुवारी त्यांचा मृतदेह रामपुरा रस्त्यावर सापडला. यादरम्यान भंवरलाल यांना मारहाण करण्यात आल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या मारहाणीप्रकरणी भाजपा (BJP) नेता दिनेश कुशवाह याला पोलिसांनी अटक केली आहे.

https://twitter.com/brajeshabpnews/status/1527868559019622401

काय आहे व्हिडीओत?
भाजपाचा (BJP) नेता दिनेश कुशवाहा या व्हिडीओत मानसिक रुग्ण असलेल्या भंवरलाल यांना आधारकार्ड दाखवण्यास सांगतो आणि त्यांना मारहाण करतो. मानसिक विकलांग असलेल्या भंवरलाल यांना आरोपी भाजपा नेता नाव विचारतो, तेव्हा भवरलाल चुकून त्यांचे नाव मोहम्मद असे सांगतात. त्यानंतर दिनेश त्यांच्यावर तुटून पडताना व्हिडीओत दिसत आहेत.

कोण आहे दिनेश कुशवाहा
या मारहाणीप्रकरणी दिनेश कुशवाहा याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दिनेश कुशवाह हा भाजपा युवा मोर्चाचा नगराचा पदाधिकारी राहिलेला आहे. त्याची पत्नी मानसी ही नगरपरिषदेच्या वॉर्डमधून निवडून आली होती.

मानसिक रुग्ण होते भवरलाल
रतलामच्या सिरसा गावच्या सरपंच पिस्ताबाई चत्तर यांना तीन मुलं होती. त्यात भवरलाल हे मोठे होते. अशोक आणि राजेश ही त्यांनी दोन्ही मुलेही समाजसेवेत आहेत. मोठा मुलगा भवरलाल हा मानसिक रुग्ण असल्याने त्याचे लग्नही करण्यात आलेले नव्हते.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
आरोपी दिनेशने या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ भवरलाल यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचला असता त्यांनी व्हिडीओच्या आधारावर भाजपा नगरसेवकाच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केला. 302 आणि 304 कलमखाली आरोपी दिनेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीमध्ये भवरलालचा मृत्यू झाला आहे.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं

Leave a Comment