हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सुशांत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे. “अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर,” असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. याआधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा”.
गृहमंत्री @AnilDeshmukhNCP हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. या आधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत,आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा… pic.twitter.com/Qv7WAkaCMU
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 6, 2020
तसेच अनिल देशमुखांच्या या खोट्या आरोपांबद्दल भाजपा तीव्र निषेध करते. जी चौकशी करायची आहे ती करा. भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस कधीच आणि कोणतंही बेकायदेशीर काम करत नाहीत,” असंही यावेळी अतुल भातखळकर यांनीही म्हटलं आहे. “राज्याने इतका राजकीय इतिहासात कधीच पाहिलेले नाहीत,” अशीही टीकाही त्यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’