कॉन्फिडन्स! ‘विरोधकांना दिवसातून 5 वेळा चंद्रकांत पाटील नावाची गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही’

सोलापूर । ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून ५ वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही असाही टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. याशिवाय शिवसेनेनं (Shivsena) धमकीची भाषा वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे,’ असा इशारा पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला दिलाय. सांगोला इथं चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

या मेळाव्यादरम्यान, चंद्रकांत पाटीलांनी सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष होत आहे. मात्र, सर्वच ठिकाणी अपयशी ठरले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

खरंतर, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. याच सामन्यात दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीकांचा वर्षाव होताना दिसत आहे. अशात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत. (mahavikas aghadi)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like