धक्कादायक ! ‘या’ भाजप नेत्याने पत्नीची हत्या करून स्वतःदेखील केली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंगेर : हॅलो महाराष्ट्र – बिहारमधील मुंगेर या ठिकाणी एका भाजप नेत्याने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केल्यानंतर स्वत:देखील आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अरुण यादव असे या भाजप नेत्याचे नाव होते. ते मुंगेरमधील भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री होते. त्यांनी आधी आपल्या पत्नीची गोळी घालून हत्या (Murder) केली आणि नंतर स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

खोलीत कारतुसांचा बेल्ट सापडला
लाल दरवाजा येथे राहणारे अरूण यादव उर्फ बडा बाबू याने देशी कट्ट्याने आधी पत्नी प्रीती कुमारी हिची हत्या (Murder) केली. नंतर याच बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. यामध्ये दोघां पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. अरूण यादव भाजप ओबीसी मोर्चा जिल्ह्याचे महामंत्री होते. तर त्यांची पत्नी यंदा मुंगेर नगर निगमच्या मेअर पदासाठी संभाव्य उमेदवार होती. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या राहत्या घरी घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.

पत्नीसोबतचं भांडण ठरलं कारण…
अरूण यादव तीन भावांमध्ये सर्वात मोठे होते. काही वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. लाल दरवाजा स्थित खोलीत अरूण यादव पत्नीसोबत राहत होते. दोन्ही भाऊ जवळच्या घरांमध्येच राहत होते. पती- पत्नीमधील वाद हा यामागचे मुख्य कारण आहे.

काय घडले नेमके ?
अरुण यादव शेतातून फेरफटका मारून सायंकाळी 5 वाजता घरी पोहोचले. आल्यानंतर त्यांनी घोड्यांना चारा दिला. चारा दिल्यानंतर खोलीत निघून गेले. काही वेळानंतर स्थानिकांनी खोलीतून दोन गोळ्यांचा आवाज ऐकला. यानंतर त्यांनी अरुण यादव यांच्या घरी धाव घेतली असता पत्नी खोलीत जमिनीवर पडली (Murder) होती. तर अरूण यादव खाटेवर मृतावस्थेत पडले होते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
63 वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये होणार इतिहासाची पुनरावृत्ती, 1959 नंतर पहिल्यांदाच…..

IND vs ENG : KL Rahul इंग्लंड सीरिजमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!

Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच; शरद पवारांनी सांगितले विज्ञानाचे महत्त्व

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवरील आंदोलनातील महिला वाहकाचा मृत्यू

Leave a Comment