63 वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये होणार इतिहासाची पुनरावृत्ती, 1959 नंतर पहिल्यांदाच…..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळत आहे. या सीरिजच्या 3 मॅच झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी वेगवेगळ्या टीमची निवड करण्यात आली आहे. आयर्लंडमध्ये टीम इंडिया 2 टी-20 मॅच खेळणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या टीमचा कर्णधार असणार आहे. आयर्लंड सीरिजमध्ये हार्दिकची (Hardik Pandya) कॅप्टन म्हणून निवड होताच 63 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

1959 साली 5 खेळाडू कर्णधार
यावर्षी जानेवारी 2022 पासून आतापर्यंत 4 खेळाडूंनी टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळले आहे. आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीमचा पाचवा कर्णधार असणार आहे. याआधी 63 वर्षांपूर्वी 1959 साली पाच खेळाडूंनी टीम इंडियाची कॅप्टन्सी केली होती. त्यावेळी हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, वीनू मंकड, गुलाबराय रामचंद आणि पंकज रॉय हे टीमचे कर्णधार होते.

यावर्षी म्हणजेच जानेवारी 2022 पासून आतापर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी टीम इंडियाची कॅप्टन्सी केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांच्याच घरी विराट कोहलीने टेस्ट सीरिजमध्ये कॅप्टन्सी केली होती. यानंतर विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन टेस्ट आणि 3 वनडे मॅचच्या सीरिजसाठी केएल राहुलने टीमचे कर्णधारपद भूषवले होते. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजसाठी रोहित शर्माने टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले होते. सध्या चालू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये ऋषभ पंत टीम इंडियाचा कर्णधार आहे. भारताची पुढची सीरिज आयर्लंडमध्ये आहे तेव्हा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीमचे कर्णधारपद सांभाळणार आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

हे पण वाचा :
‘तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता’ म्हणत लेकाने बापावर केले कोयत्याने वार

नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यानं तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण

‘आता रस्त्यावर पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवणाऱ्याला मिळणार 500 रुपयांचे बक्षीस’

धक्कादायक ! आश्रममध्ये काम करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला, काय घडले नेमके?

EPFO : नॉमिनेशन नसेल तर क्लेम दाखल करण्यासाठी काय करावे लागेल ते समजून घ्या

Leave a Comment