दिल्ली । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगितीचा निर्णय दिल्यापासून विरोधकांनी ठाकरे सरकाराला घेरलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार कमी पडलं असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आपण कुठेतरी कोर्टाला सांगण्यात कमी पडलो आहोत, ते कोर्टाला समजावून सांगावं लागेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर दिलेली स्थगिती तीन न्यायाधीशांच्या समितीनं दिलंय आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून जोवर स्थगिती उठवली जात नाही, तोवर स्थगिती कायम राहील असंही फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही नियोजनपूर्वक स्ट्रॅटेजीने कोर्टात जायचो, कोर्टातील सुनावणीत कायम सतर्क राहावं लागतं, असंही फडणवीस म्हणाले. मराठा समाजाच्या सगळ्या संघटनांनी सांगितलं की, राज्य सरकार कमी पडतंय. हा माझ्याकरता राजकारणाचा मुद्दा नाही. आपण यात मार्ग काढला पाहिजे, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण कसं मिळेल, हे पाहायला हवं, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. “मला जिथपर्यंत कायदा कळतो त्याप्रमाणे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश आणू शकतो. फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आम्हाला मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचं नाही तर विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे. काहींना मराठा समाजात प्रक्षोभ वाढावी असं वाटत असेल,” अशी टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन करताना मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.